NHM Satara Bharti Appointment Order 2025 सातारा आरोग्य अभियान पदभरती नियुक्ती आदेश

NHM Satara Bharti Appointment Order. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सातारा अंतर्गत विविध आरोग्य सेवा पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराची निवड यादी जाहीर करण्यात आली असून यांना निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्तीने नेमणूक देण्यात येणार आहेत असा नियुक्ती आदेश काढण्यात आला आहे.. हि कंत्राटी पद नेमणूक दिनांक १५ एप्रिल २०२५ ते २९ जून २०२५ या कालावधीसाठी असणार आहे याची निवड झालेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच या पदावर नियुक्त होण्यासाठी पात्र उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत हजर व्हावे असे सांगण्यात येत आहे.

NHM सातारा भरती अंतर्गत कंत्राटी पदभरती साठी काही महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.

या नियुक्ती आदेशामध्ये उमेदवारांना जसे कि निवड झालेल्या उमेदवारांचे नाव, निवड कोणत्या पदासाठी झाली आहे, कार्यक्रमाचे नाव, उमेदवारांच्या पसंती नुसार नियुक्ती ठिकाण,निवड झालेल्या उमेदवारांचा मूळ जाती प्रवर्ग कोणता होता आणि त्यांनी निवड कोणत्या प्रवर्गातून झाली आहे याचा उल्लेख आहे तसेच सर्व पदांकरिता एकत्रित मानधन किती आहे याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

नियुक्ती आदेशामध्ये काही नियम व अटी दिलेल्या आहेत. NHM ZP सातारा अंतर्गत कंत्राटी पद निवड झालेल्या उमेदवारांसाठी हे नियम लागू असतील. या ठिकाणी आपण थोडक्यात हे नियम व अटी समजून घेऊ सर्व नियम व अटी समजून घेण्यासाठी उमेदवारांनी ZP सातारा च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. –

  • उमेदवारांना नियुक्तीच्या दिवसापासून सात दिवसाच्या आगोदर हजर राहणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले आहे.
  • हि नेमणूक तात्पुरत्या स्वरुपाची असून करार तत्वावर कंत्राटी पद्धतीने आहे.
  • कोणत्याही उमेदवारांनी नियुक्ती नंतर राजीनामा देण्यापूर्वी 1 महिना अगोदर नोटीस द्यावी किंवा 1 महिन्याची पगार द्यावी.
  • NHM सातारा या पदासाठी नियुक्त उमेदवारांची कामगिरी जर समाधानकारक नसेल तर कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता उमेदवारांचि नियुक्ती रद्द केली जाऊ शकते.
  • तसेच या नियुक्ती आदेशामध्ये कामकाजाची वेळ तसेच अन्य बर्याच गोष्टींचा समावेश आहे. आणखीन सर्व सविस्तर माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळ पाहावे.

Important Links :

Official Website :    Click Here
Our Website :    Click Here