All India Sainik School Admission Counselling 2025 Process Start.
AISSAC Counselling Process 2025 Information : ऑल इंडिया सैनिक स्कुल ऍडमिशन कौन्सलिंग प्रक्रिया माहिती : ऑल इंडिया सैनिक स्कुल प्रवेश परीक्षा AISSAC हि मुख्यतः इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेचा निकाल राष्ट्रीय मेरिट यादीवर जाहीर झाला आहे. जे विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून मेरिट यादीत आले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी AISSAC च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन कौन्सलिंग नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
AISSAC कौन्सलिंग संदर्भात काही महत्वाचे मुद्दे –
शाळांची निवड कशी करावी – कौन्सलिंग प्रक्रियेदरम्यान विध्यार्थी किमान १ आणि जास्तीत जास्त १० शाळांची निवड आपापल्या प्राधान्यक्रमाने देऊ शकतात. विध्यार्थ्यानी शाळांची निवड करताना याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. कारण प्राधान्यक्रमांकानुसारच विध्यार्थ्यांना शाळा अलॉट केली जाते.
कौन्सलिंग प्रवेश फेरी काय असते ? – AISSAC कौन्सलिंग प्रवेश फेरी तीन विभागात आयोजित केली जाऊ शकते.
पहिली फेरी – पहिल्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी सर्व पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी केले असतील आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे असे विद्यार्थी निवड झालेल्या संबंधित शाळेत आपला प्रवेश निश्चित करू शकतात किंवा ती शाळा नाकारून दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी अर्ज करू शकतात. आणि जे विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रवेश फेरीसाठी अर्ज करून सुध्या त्यांची निवड झाली नाही ते दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीसाठी अर्ज करू शकतात. |
दुसरी फेरी – ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेश फेरीमध्ये निवड झाली नाही आणि ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेश फेरीमध्ये निवड होऊन सुद्धा त्यांना त्यांचा इच्छेप्रमाणे प्राधान्यक्रमांकानुसार संबंधित शाळा मिळाली नाही असे विद्यार्थी पुन्हा दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात. |
तिसरी फेरी – ज्या विदयार्थ्यांची पहिल्या आणि दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीमध्ये निवड झाली होती आणि त्यांनी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे असे विद्यार्थी वगळून आणि ज्या शाळांमध्ये किती रिकाम्या जागा शिल्लक आहेत यावर आधारित तिसरी प्रवेश फेरी असते. ज्या विद्यार्थ्यांची पहिल्या व दुसऱ्या कौन्सलिंग प्रवेश फेरीत निवड झाली नाही असे विद्यार्थी तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी अर्ज करू शकतात. |
AISSAC 2025 कौन्सलिंग प्रक्रियेसाठी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- ओळखपत्र – कौन्सलिंग साठी पात्र विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तसेच आई / वडील यांचे ओळखपत्र लागते.
- निवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- शाळेचे प्रमाणपत्र ६ वी, ९वी
- प्रोव्हिजनल ऍडमिशन लेटर
- AISSAC 2025 Score Card
महत्वाच्या लिंक्स : Important Links
AISSEE 2025 PORTAL : | Click Here |
अधिकृत संकेतस्थळ : | Click Here |
ई – कौन्सलिंग प्रोसेस : | Click Here |