Career Options After 10th Pass in india – 10वी नंतर करिअरच्या विविध वाटा

Career Options After 10th (SSC) Pass – 10वी संपल्यावर पुढे काय करिअर निवडावे याबद्दल आपल्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांच्या मनात हा प्रश्न खूप येतो कि आता पुढे काय करावे कोणते करिअर निवडावे ? आपल्यासाठी कोणते करिअर योग्य असेल ?

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो १० वी परीक्षा संपली कि आपल्या सर्वाना एक प्रश्न पडतो कि आता पुढे काय करिअर निवडायचं काय करायचं नेमका हाच प्रश्न सर्वांच्या मनात सतत येत असतो आणि येणारच कारण १० वी पर्यंत आपल्याला पुढे काय करायचं हे आपल्याला कोणी सांगितलं नसत आणि आपली आवड कशात हे ओळखून आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा पण कोणी नसतो मग करिअर निवडीच्या संदर्भात असे प्रश्न मनात येणार हे स्वाभाविकच आहे. आजच्या या लेखात आपण १० वी नंतर करिअरच्या विविध वाटा काय काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

career options after 10th

करिअर निवडत असताना आपली आवड आणि कार्यक्षमता याचा विचार केला तर भविष्यातील करिअर भक्कम बनते. चला तर मग १० वी नंतर कला शाखा, वाणिज्य शाखा, विज्ञान शाखा, ITI – व्यवसायिक शिक्षण आणि Diploma – कौशल्य आधारित शिक्षण याबद्दल परिपूर्ण माहिती घेऊया.

कला शाखा :

कला शाखेमध्ये ऍडमिशन घेतल्यावर आपल्याला इयत्ता अकरावी आणि बारावी मध्ये मराठी, हिंदी,इंग्रजी या अनिवार्य विषयांसोबत समाजशात्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांपैकी आपल्या आवडीचे विषय निवडावे लागतात. हे विषय निवडताना विद्यार्थ्यांनी दखल घेतली पाहिजे आपल्या आवडीचेच विषय निवडावे कारण बारावी संपल्यावर पदवीला ऍडमिशन घेते वेळी विषय बदलीचा पर्याय आपल्यासमोर खुला असतो परंतु जे विषय आपण ११ वि १२ वि ला निवडले होते तेच विषय ईथेही घेऊ शकतो जसे कि या विषयांचा आपला पाया आधीच मजबूत बनलेला असतो. आणि पदवीला या विषयांचा सखोल अभ्यासक्रम आपल्याला अगदी सोपा जातो.

वाणिज्य शाखा :

वाणिज्य शाखेत मुख्यतः आपल्याला व्यवसाय आणि वित्त या दोन विषयांचा प्रमुख अभ्यासक्रम पहाया मिळेल. विषय – अर्थशास्त्र, टॅक्स, अकाउंट, गणित कॉस्टिंग हे विषय प्रामुख्याने अभ्यासले जातात.

विज्ञान शाखा :

या शाखेत ऍडमिशन घेतल्यावर आपल्याला करिअरच्या विविध वाटा उपलब्ध असून प्रामुख्याने रसायनशाश्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, या विषयांचा समावेश होतो. विज्ञान शाखेत ऍडमिशन घेतल्यावर विद्यार्थ्याला मराठी किंवा हिंदी अनिवार्य विषय सोडून बाकीचे सर्व विषय इंग्रजी मध्ये अभ्यासावे लागतात. या शाखेत ऍडमिशन घेतलेल्या विदयार्थ्यांच्या बौद्धिक पातळीवर ताण पडाया सुरुवात होते. तसेच विध्यार्थ्यांना गणित विषय निवडायच्या बाबतीत अनिवार्य नसते या ठिकाणी विद्यार्थी भूगोल किंवा कृषी विषय आपल्या पसंतीनुसार निवडू शकतो.

ITI – व्यवसायिक अभ्यासक्रम :

जे विद्यार्थी १० वि झाल्यानंतर १ ते दोन वर्षाचा व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छितात ते या शाखेकडे वळतात या शाखेमध्ये प्रामुख्याने – डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन,फेशन डिझाइनर,पेंटर,फिटर,वेल्डर,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,वायरमन,रेफ्रिजरेशन,एअर कंडिशनिंग मेकॅनिक या व्यवसायिक अभ्यासक्रमाचा समावेश होतो. आयटीआय नंतर विध्यार्थी लगेच सरकारी किंवा खाजगी कंपनीत प्रशिक्षण करण्यासाठी नोंदणी करू शकतो. थेट खाजगी कंपनीत नोकरी मिळवू शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी असंख्य करिअरच्या वाता उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आयटीआय संपल्यावर पुढे शिक्षण घ्यावयाचे आहे असे विद्यार्थी १० वि नंतर डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला ऍडमिशन घेऊ शकतात आणि पुढे शिक्षण चालू ठेऊ शकतात.

डिप्लोमा अभ्यासक्रम – कौशल्य आधारित अभ्यासक्रम :

जे विद्यार्थी १० वि नंतर या अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेऊ इच्छितात यांना मेकॅनिकल, सिव्हिल,इलेक्ट्रिकल ,संगणकशाश्त्र, इलेकट्रोनिक्स,इन्फॉर्मशन टेक्नोलोंजि या विषयांचा अभ्यास करावा लागतो. यासोबतच विद्यार्थी कृषी, मेडिकल,कला यांसारख्या शाखेतील उपलब्ध असलेल्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना थेट नोकरीच्या असंख्या संधी उपलब्ध असून विद्यार्थी आणखीन पुढे शिक्षण घेऊ इच्छित असल्यात तो संबंधित विषयात अभियांत्रिकी तसेच अन्य शाखेतील उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन करू शकतात.

मित्रांनॊ आपण या लेखात १० वी नंतर आपल्याला विविध करिअरचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत याबद्दल माहिती घेतली असून यापुढील लेखात आपण कला,वाणिज्य,विज्ञान, ITI आणि Diploma Courses नंतर आणखीन कोणते नवीन करिअरचे मार्ग आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

Leave a Comment